गणेशोत्सव 2024

Lalbaugcha Raja : लालबागचा राजा गिरगाव चौपाटी परिसरात दाखल

दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना काल निरोप देण्यात आला.

Published by : Siddhi Naringrekar

दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना काल निरोप देण्यात आला. बाप्पाची सेवा केल्यानंतर काल थाटामाटात बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन केले गेले.

लालबागच्या राजाची मुंबईत भव्य दिव्य मिरवणूक सुरु आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. लालबागचा राजा गिरगाव चौपाटी परिसरात दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. मिरवणूकीत गणेशभक्तांचा उत्साह पाहायला मिळत आहे.

यावेळी लालबागच्या राजाला मुंबई अग्निशमन दलाकडून मानवंदना देण्यात आली. लालबागचा राजाला अग्निशमन दलाच्या कार्यालयाच्या समोर येताच सायरन वाजवून मानवंदना देण्यात आली.

आता लालबागचा राजा गिरगाव चौपाटी परिसरात दाखल झाला असून सकाळी 8 वाजता गिरगाव चौपाटीवर बाप्पाला निरोप देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त मिरवणूकीत सामील झालेलं पाहायला मिळत आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी